Saturday, April 26, 2025
Homeक्राईमNashik Crime News : गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

Nashik Crime News : गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर रोडवरील (Gangapur Road) प्रमोद महाजन गार्डन परिसरात गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या सराईत गुंडास गुन्हेशाखेच्या युनिट दोनने अटक (Arrested) केली आहे. किरण सुकलाल केवर (२५, रा. रामवैभव अपार्टमेंट, हनुमानवाडी, मखमलाबाद रोड, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर खून, गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल असून त्याने हा कट्टा कुणाकडून व का आणला याचा तपास सुरु आहे. 

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरुळला भरदिवसा वृद्ध महिलेचा खून

शहर गुन्हेशाखा युनिट दोनचे (Crime Branch Unit Two) अंमलदार मनोहर शिंदे, महेश खांडबहाले यांना संशयित केवर याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी (दि. ९) प्रमोद महाजन गार्डन परिसरात सापळा रचून अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी कट्टा (Gavthi Katta) जप्त करण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik News : सिटीलिंक बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडी ठार

दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात (Sarkarwada Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी सहायक उपनिरीक्षक विवेकानंद पाठक, हवालदार मनोहर शिंदे, विशाल कुवर, समाधान वाजे, स्वप्निल जुंद्रे, महेश खांडबहाले, तेजस मते यांच्या पथकाने (Squad) केली.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...