Tuesday, September 17, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेत एका दिवसात 4 लाखांहून अधिक नवे करोना रुग्ण!

अमेरिकेत एका दिवसात 4 लाखांहून अधिक नवे करोना रुग्ण!

वॉशिंग्टन –

- Advertisement -

अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 4 लाख 3 हजार 359 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 2500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीएस) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये करोनाचे 4 लाख 3 हजार 359 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 11 डिसेंबर ला अमेरिकेत एका दिवसातील आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. 11 डिसेंबरला अमेरिकेत 2 लाख 44 हजार 11 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आजचा आकडा किती भयंकर आहे हे लक्षात येतं.

गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांची संख्या 2,756 इतकी असल्याचं सीडीएसने जाहीर केलं आहे. जगभरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेतच आढळून येत आहेत. आतापर्यंत 1.76 कोटींहून अधिक रुग्णांची अमेरिकेत नोंद झाली आहे. तर 3 लाख 15 हजार 600 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे अमेरिकेत करोनावरील लसीकरणही सुरु झालं आहे. पण त्याचवेळी संक्रमणाचंही प्रमाण वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेतील तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या एकूण कैद्यांपैकी प्रत्येक 5 कैद्यांमागे एक कैदी करोना पॉझिटीव्ह असल्याची आकडेवारीही समोर आली होती. करोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरं जात असलेल्या अमेरिकेत 4 नोव्हेंबरपासून दररोज 1 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या