Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik News : पत्रकारीता, विज्ञान शाखेच्या परिक्षा अर्जात विद्यापीठाचा घोळ; विद्यार्थ्यांना मनस्ताप

Nashik News : पत्रकारीता, विज्ञान शाखेच्या परिक्षा अर्जात विद्यापीठाचा घोळ; विद्यार्थ्यांना मनस्ताप

नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) सध्या आँक्टोबर २०२४ चे परिक्षा अर्ज भरणे सुरु असून पत्रकारीता प्रथम वर्षे (एनईपी २०२४),विज्ञान शाखेसह इतरही शाखांचे परिक्षा अर्ज (Exam Form) भरणे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण या लिंकमध्ये संबंधीत शाखांच्या विषयांचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरता येत नाही. जुन्या आणि नव्या(एनईपी) अभ्यासक्रमाच्या रचनेमुळे हा सारा घोळ झाला असून विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. या निष्क्रीय,भोंगळ कामकाजपध्दतीचा विद्यार्थ्यांना फटका बसला असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. याप्रकरणी विद्यापीठाकडून कॉलेज,विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही तसेच संबंधित शाखांचे,परिक्षा आणि आयटीविभाग हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत टोलवाटोलवी करत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यात भाजपला मोठे भगदाड; नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अभ्यासक्रम,परिक्षेतील घोळ हे जणू समीकरणच झाले आहे. दरवर्षी विद्यापीठाचा कुठल्यातरी विषयात भोंगळ कारभार होतो आणि त्याचा नाहक फटका महाविद्यालय,विद्यार्थ्यांना होतो. सध्या कला,वाणिज्य,विज्ञान शाखांपैकी काही शाखांचे अर्ज भरणे झाले असून पत्रकारीता, विज्ञान,इंजिनिअरिंग शाखांचे ऑक्टोबर २०२४ च्या परिक्षांचे अर्ज भरणे सुरु आहे. पत्रकारीतेच्या परिक्षा (Journalism Exams) अर्ज भरणे लिंक १७ ऑक्टोबरला खुली करण्यात आली. ती विनाविलंब गुरुवार(ता.२४) पर्यत खुली आहे.

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

त्यानंतर शनिवार(ता.२६) पर्यत विद्यार्थी विलंब शुल्काने अर्ज भरू शकतात, मात्र पहिल्या दिवसापासूनच या लिंकवर बी फॉर्म २०१९ पॅटर्नचे विषय दिसत आहे. त्यामुळे विषय निवडता येत नाही. विद्यापीठ क्षेत्रातील कॉलेजने फॉर्मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. त्यानंतर [email protected] या मेलवर मेल करण्यास सांगण्यात आले. कॉलेज,संबंधीत विभागाकडून मेलही केले,पण कुठलाही प्रतिसाद विद्यापीठाकडून मिळाला नाही. उलट शाखांचे विभाग परिक्षा विभागास तर परिक्षा विभाग (Exam Department) आयटी विभागास संपर्क साधण्यास सांगत आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime : बेदसह बडगुजरवर मोक्का; अडचणी वाढल्या

अति घाईमुळे सर्वांनाच मनस्ताप

मूळात विद्यापीठाने कुठल्याही शाखांचे अर्ज सुरु करण्याअगोदर संबंधित लिंकवर त्या शाखांचे विषय दिसतात का हे पाहणे आवश्यक होते, मात्र दिवाळीच्या सुट्या लागणार असल्याने घाईघाईने न पाहता परिक्षा अर्जांच्या लिंक खुल्या करून दिल्या आणि कुठल्याही शाखांचे विषय ते दुसऱ्या शाखेस जोडले गेले. विशेषतः पत्रकारीता आणि विज्ञान शाखेच्या परिक्षेबाबत हे जास्त झाले आहे. विद्यापीठाच्या संबंधीत विभागाच्या नजरेस ही चूक आणून दिल्यानंतरही होईल काळजी नको,काम सुरु आहे असे विद्यार्थ्यांनी (Student) शिक्षकांनी संपर्क केल्यानंतर सांगितले जात आहे. विद्यापीठाने दिलेली वेळ उदया(ता.२४) ला संपत आल्याने विद्यार्थी तणावात आहे.

हे देखील वाचा : Nashik News : आजपासून उमेदवारी अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात; २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत

नव्या जुन्या अभ्यासक्रम रचनेचा घोळ

यंदाच्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी पॅटर्न २०२४) विषय आहेत तर जुन्या बॅचला (२०२९ पॅटर्न) विषय आहे, विद्यापीठात फक्त जर्नालिझम विभागात गेल्या वर्षी एनईपी पॅटर्न आणि त्यासंदर्भातील विषय लागू झाले मात्र इतरत्र यंदाच्या वर्षी हा अभ्यासक्रम लागू झाला. त्यामुळे जुन्या नव्या विषयांचा घोळ सुरु असल्याने प्रथम वर्षाचे अर्ज भरतांना हवे ते विषय दिसत नसून जुने विषय दिसत असल्याने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

हे देखील वाचा : Political Special : नाशिक मध्यसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच

पत्रकारीता,विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्जाबाबत होत असलेल्या अडचणींची माहिती काही संस्था विद्यार्थ्यांनी आज दिली. परिक्षा अर्जातील त्रुटी दूर करून गैरसोय टाळण्यासाठी अधिकाऱ्यांशी बोलुन मार्ग काढू. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. शिवाय मुदतवाढूनही मिळेल, यासाठी प्रयत्न करू.

सागर वैद्य, मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या