Saturday, April 26, 2025
Homeनाशिकमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ स्थगित

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ स्थगित

नाशिक। प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा (University of Health Sciences) दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित एकविसावा दीक्षांत समारंभ स्थगित करण्यात आला आहे Convocation Ceremony Postponed.

- Advertisement -

भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) ​यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

​विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार होणार होता. राष्ट्रीय दुखवटयामुळे दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

​विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, या अनुषंगाने सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सूचीत करावे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...