Friday, May 31, 2024
Homeनाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल जाहीर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-2023 सत्रातील लेखी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, दि. 20 जून, 2023 पासून राज्यातील विविध परीक्षाकेंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मार्ड (MARD) या विद्यार्थी संघटनेने, अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या (राष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त संस्थांमध्ये) प्रवेश प्रक्रियेस सहभागी होण्याकरीता सदर अभ्यासक्रमाचा निकाल दि. 31 जुलै 2023 पुर्वी जाहीर करण्यात यावा, अशी विनंती केलेली होती. त्याअनुषंगाने 20 जून, 2023 पासून संचलित करण्यात आलेल्या PG Medical : (MD, MS, PG Diploma, M.Sc.Medical (Biochemistry/Microbiology) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रिन इव्हॅल्युएशन पध्दत राबविण्यात आली. याकरीता विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेकडून मान्यता घेण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ते पुढे म्हणाले की, पदव्यूत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले. सदर उत्तरपत्रिका ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासणीसाठी विद्यापीठ संलग्नित 41 वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये Digital Evaluation Centre ची उभारणी करुन ऑनलाईन पध्दतीने मुल्यांकन करण्यात आले. उत्तरपत्रिकांची ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासणी प्रक्रिया राबवितांना येणाÚया समस्या सोडविण्यासाठी कुलगुरु महोदया यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

विद्यार्थ्यांना आश्वासित केल्यानुसार, वेळेची निकड व विद्यार्थीहित लक्षात घेता Onscreen Evaluation of Answer Books प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात आली आणि पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाचा निकाल प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा दि. 18 जुलै 2023 रोजी संपली व दि. 20 जुलै 2023 रोजी निकाल जलदगतीने जाहीर करण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी सांगितले.

सदर ऑनस्क्रिन इव्हॅल्युएशन या प्रायोगिक तत्वावरील प्रणालीचे कार्य यशस्वीतेच्या अनुषंगाने हिवाळी-2023 सत्रातील परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रमांना सदर पध्दत लागू करण्याचा विद्यापीठाचा मानस असून त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले

- Advertisment -

ताज्या बातम्या