Saturday, May 4, 2024
Homeनाशिकसप्तश्रुंगी गडावरील दरीत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरु

सप्तश्रुंगी गडावरील दरीत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरु

वार्ताहर | सप्तशृंगीगड

सप्तशृंगी गडावर जाताना मध्यांतर असलेले सेल्फी पॉईंट येथे ७०० फुट दरीत ४० ते ४५ वर्षीय युवकाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पडली नसून मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात आल्याचे प्रतिनिधीने सांगितले…

- Advertisement -

आज सकाळी परिसरात वास येत होता. यावेळी काही नागरिकांनी खोल दरीत बघितले असता मृतदेह पडलेला दिसून आला. यानंतर याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला देण्यात आली.

पोलीस प्रशासन आणि पोलीस मित्रांच्या मदतीने एका दोरीचा साहाय्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविणे मोठे आव्हान आता यंत्रणेसमोर आहे.

या घटनेचा तपास पोलीस उपवीभागीय अधीक्षक अमोल गायकवाड व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरी पोलीस कर्मचारी एस. आय. खाडे, पोलीस नाईक योगेश गवळी, पोलीस कर्मचारी शिवा शिंदे, पोलीस कर्मचारी कोशिरे.करत आहेत.

यावेळी समाज सेवक भूषण देशमुख.पोलीस मित्र चंद्रकांत पांनपाटील तसेच सप्तशृंगी गड ग्रामपंचायत सफाई कामगार आदींनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण

मृतदेह आठवड्याभरापूर्वीचा आहे त्यामुळे ओळख पटत नाहीये. हीआत्महत्या असेल की हत्या याबाबतची चौकशी पोलीस घेत आहेत. असे असले तरीदेखील ही आत्महत्या की हत्या याबाबतच्या चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र चर्चिल्या जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या