Sunday, May 26, 2024
HomeनाशिकNashik Surgana News : अज्ञाताकडून भाताच्या गंजीला आग; हजारोंचे नुकसान

Nashik Surgana News : अज्ञाताकडून भाताच्या गंजीला आग; हजारोंचे नुकसान

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

तालुक्यातील उंबरदे (प) येथील विधवा महिला शेतकरी तुळशीबाई आनंदा कनोजे (वय ६०) यांनी आपल्या शेतात (Farm) भाताची (Rice) व उडदाची कापणी करुन मळणीसाठी गंजी रचून ठेवली होती. मात्र, शुक्रवार (दि.०१ डिसेंबर) रोजी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळा करून ठेवलेल्या भाताच्या गंजीला आग लावल्याने संपूर्ण भात जळून खाक झाले. त्यामुळे सदर महिलेचे (Woman) हजारोंचे नुकसान झाले आहे…

- Advertisement -

NCP Crisis : “अजित पवारांची भूमिका…”; ‘त्या’ गौप्यस्फोटाबाबत शरद पवार स्पष्टच बोलले

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळशीबाई कनोजे यांना तीन मुली असून त्यांच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले. तर तिनही मुलींचे लग्न (Marriage) झाले असून मुलगा नसल्याने जावई दिनेश पवार, मुलगी रेश्मा पवार व तुळशीबाई कनोजे हे तिघे जण एकत्र उंबरदे येथे राहतात. मुलगी रेश्मा ही कांदा लागवडीसाठी भल्या पहाटे कळवण तालुक्यात (Kalwan taluka) मजुरीनिमित्त निघून गेली होती.

यावेळी तुळशीबाई या सकाळी उठून शेताकडे गेल्या असता त्यांना डोळ्यासमोर कष्टाने पिकवलेली भाताची गंजी जळतांना दिसली. त्यामुळे त्यांनी एकच हंबरडा फोडला.तुळशीबाई यांच्याकडे बैल नसल्याने त्यांनी हात नांगरणी व कुदळीने पोंद्या ओढून पेरणी आणि चिखल करत भाताची लागवड केली होती. पंरतु,आता मेहनत करून पिकवलेली भाताची गंजी जळून गेल्याने तुळशीबाई कनोजे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Nashik Dindori Crime News : बापानेच दिली मुलाची सुपारी; पालखेड येथील खुनाचा उलगडा

दरम्यान, ही घटना पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना समजताच पो.ह. दिलीप वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांनी घटनेची गंभीर दखल घेत तलाठी यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले. याप्रकरणी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून परिसरातील शेतकऱ्यांनी कसून चौकशीची मागणी केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पालकमंत्री भुसेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

- Advertisment -

ताज्या बातम्या