Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड, नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis : मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात महिलेने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून दिली. गुरुवारी (ता. २६ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी फडणवीसांच्या कार्यलयाकडून तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मात्र गृहमंत्री फडणवीस यांचंच कार्यालय सुरक्षित नसेल, तर जनतेच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...