Sunday, May 18, 2025
Homeधुळेजिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

धुळे । dhule प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) कृषी व पशुसंवर्धन समितीच्या (Agriculture and Animal Husbandry Committee) सभापतीपदी हर्षवर्धन दहिते, महिला व बालकल्याण समितीच्या (Women and Child Welfare Committee) सभापतीपदी संजीवनी सिसोदे, समाजकल्याण समितीच्या (Social Welfare Committee) सभापतीपदी कैलास पावरा, शिक्षण व आरोग्य समितीच्या (Education and Health Committee) सभापतीपदी महावीरसिंह रावल यांची बिनविरोध निवड (Uncontested choice) करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीनंतर चार विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया आज पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सत्ताधारी भाजपातर्फे सभापती पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. तथापि, जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता असल्याने यावेळी शिंदखेडा तालुक्यास दोन आणि शिरपूर व साक्री तालुक्यास एक सभापती देण्याचा निर्णय यापुर्वीच घेण्यात आला होता. मात्र, उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नव्हती.

आज सकाळी भाजपातर्फे चारही सभापती पदासाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. त्यात कृषी व पशूसंवर्धन सभापतीपदासाठी निजामपूर गटाचे साक्री तालुक्यातील निजामपूर गटाचे हर्षवर्धन दहिते यांनी उमेदवारी अर्ज, महिला व बाल कल्याण समिती सभापतीसाठी शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गटाच्या संजीवनी सिसोदे, समाज कल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिरपूर तालुक्यातील रोहीणी गटाचे सदस्य कैलास पावरा आणि शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी साक्री तालुक्यातील मालपूर गटाचे महावीरसिंह रावल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्यासह लक्ष्मिकांत शाह, ललित आरुजा, वासुदेव बदामे, अजित शाह, संग्राम पाटील, देवेंद्र पाटील, किशोर संघवी, प्रा.अरविंद जाधव, मंगला पाटील, कुसूम निकम, मुन्ना देवरे, शेखर माळी, उत्पल नांद्रे, कुंदन देवरे, छोटू सोनवणे, सुधीर अकलाडे, विजय ठाकरे, दिपक भारुडे, छगन राऊत, रमेश सरग, हर्षल बिरारीस, प्रवीण देवरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होवू नये यासाठी महाविकास आघाडीतर्फे देखील उमेदवार देण्यात आले. बेटाबद गटाचे ललित वारुडे, दुसाने गटाचे पोपटराव सोनवणे, कुडाशी गटाचे धीरज अहिरे, देऊर बु. गटाच्या जिजाबाई पारधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व उमेदवारांचे समर्थक उपस्थित होते.

दुपारी पिठासीन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या प्रारंभी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात आठही अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी अर्ज माघार घेतल्याने चारही सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकार्‍यांनी जाहीर केले. त्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच जि. प. अध्यक्षा अश्विनी पाटील यांनीही नुतन सभापतींचा सत्कार केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...