Sunday, April 6, 2025
Homeनगरनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई द्या - आ. दाते

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई द्या – आ. दाते

पंचनामे करण्याचे अधिकार्‍यांना आदेश

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीचे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून सरकारने शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, असे आमदार काशिनाथ दाते यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍यांना गुरुवारी (दि. 3) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने पुन्हा एकदा जबर फटका दिला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असे आदेश आमदार काशिनाथ दाते यांनी तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती गट विकास अधिकार्‍यांना दिले आहे.

पारनेर तालुक्यातील वनकुटे, काकणेवाडी, नारायणगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, वाडेगव्हाण, कुरुंद, पाडळी रांजणगाव, तास या भागात वादळी वार्‍यासह गारपीट झाली असून यामध्ये कांदा, मका, मिरची, कलिंगड, टोमॅटो, झेंडू, डाळिंब, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जो काही शेतीमाल शेतकर्‍यांच्या हातात आला त्या मालाला भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. निसर्गाने पुन्हा एकदा शेतकर्‍यांवर सूड उगवला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळीवारा, चक्रीवादळ यामुळे रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला आणि फळबागांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पाऊस चक्रीवादळ आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामांकडून असलेल्या अपेक्षांवर पाणी फेरले.

नैसर्गिक आपत्तीत पारनेर तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे 1589 शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी यासाठी पंचनामे वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : रामपूरवाडी येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील रामपूरवाडी येथे झालेल्या घर फोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून 2 लाख 76 हजार रुपये...