नाशिक | Nashik
जिल्ह्यांतील अनेक भागात आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिंपळगाव परिसरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच धावपळ उडाली. काढणीला आलेल्या द्राक्षबागांना बसला आहे…
- Advertisement -
आज दुपारच्या सुमारास आलेल्या अवकाळीने अनेकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील पिंपळगाव, सिन्नर, पालखेड, कळवण तसेच बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात अवकाळीने हजेरी लावली.
तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे गारांसह झालेल्या अवकाळीने द्राक्षबागांसह काढणीला आलेल्या इतर पिकांचे अतोनात नुकसान केले.