नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील शेतकर्यांच्या केळी, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान कृषी विभागाच्या माहितीनुसार दि.20 मे रोजी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने तालुक्यातील वरखेड, गिडेगाव, खामगाव, शिरसगाव, जेऊर हैबती, माका, महालक्ष्मीहिवरे, रामडोह, गोपाळपूर या 10 गावातील 52 शेतकर्यांचे 27.30 हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब, केळी, आंबा, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे.
नेवासा तालुक्यात गेल्या आठवड्यात जोराच्या वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात डाळिंब, केळी, आंबा, बाजरी या पिकांचे तसेच कांदा, कडधान्य, भुईमूग, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाल्याची माहिती आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी दिली.