नाशिक | Nashik
जिल्ह्यातील काही भागांत आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर उन्हाचा कडाका जाणवत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज दुपारच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) नांदूरशिंगोटे (Nandur shingote) येथे अचानकपणे पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली…
गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा?
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरुवातीला पाच मिनिटे पावसाच्या (Rain) सरींसोबत गारा पडल्या. त्यानंतर गारा (Hail) बंद झाल्याने २० मिनिटे या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यामुळे शेतावर असलेल्या कांद्याच्या (Onion) पोळी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची (Farmers) धावपळ झाली.
राहुल गांधींना पुन्हा खासदारकी? आज निकालाची शक्यता
दरम्यान, यावेळी काही शेतकऱ्यांनी कागदाने (ताडपत्री) कांद्याच्या पोळी झाकल्या. परंतु,काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पोळी पावसाने भिजल्यामुळे नुकसान (Damage) झाले. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.