Friday, May 31, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यात काही भागात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात (atmosphere) कमालीचा बदल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह हातावर पोट असणाऱ्या सामान्य जनतेची चिंता वाढली आहे…

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील बागलाण कळवणसह अन्य काही ठिकाणी तालुक्यांमध्ये वातावरण बदलामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात या अवकाळी पावसाने (rain) धडक दिल्यामुळे मुल्हेर, कांद्याचामळा (Onion) या गावांसह, कळवणच्या अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात पावसाने हजेरी लावली.

मोठी बातमी ! बारावी पेपर फुटीप्रकरणी दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू (Wheat), हरबऱ्यासह आंबा मोहराला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला असल्याने परिसरातील शेतकरी (farmer) हवालदिल झाला आहे.

Video : कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव; डॉ. भारती पवार म्हणाल्या…

अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील कांदा आणि अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दोन दिवसापासून असलेले खराब  वातावरण लवकरच निवळले नाही तर कांदापीक धोक्यात जाईल त्याबरोबरच आंब्याचेही मोठे नुकसान होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या