कुरखळी curkhali । वार्ताहर
मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यात दरवर्षाप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकर्यांनी (farmers) उन्हाळी मिरची (Planting summer peppers) लागवड करत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ (rise in temperature) होत असल्याने उन्हाच्या तिव्रतेमुळे मिरची लागवड (Chilli cultivation) धोक्यात (danger) आली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकर्यांना वाढत्या तापमानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण
शिरपूर तालुक्यातील तर्हाडी, वरुळ, भटाणे, जवखेडा, तर्हाडकसबे, अभानपुर, जळोद, विखरण, भामपुर आदी भागातील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करतात. मल्चिंग पेपर शेतकर्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होत आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच या उपक्रमाचा फायदा शेतकर्यांना होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. दरवर्षी शेतकरी मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिल अखेर व मे महिन्यात लागवड करत असतो. यावर्षी देखील शेतकर्यांनी मिरचीसाठी पाणी राखून ठेवत मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली आहे.
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…
परंतु मागील काही दिवसापासून तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने लागवड केलेली मिरचीचे कोवळी रोपे जागीच जळू लागली आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका बसत आहे. दीड रुपया रोपाने शेतकर्यांनी मिरची लागवड केली आहे. त्यात अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकर्यांना आर्थिक झळ बसू लागली आहे. मिरचीचे रोप वाचविण्यासाठी शेतकरी दिवसांपासून तीन ते चार वेळा मिरचीला पाणी देऊ लागला आहे. मागील वर्षी अधिक पर्जन्यमानाचा शेतकर्यांना फायदा झाला आहे.
दरम्यान एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे जास्त भाव शेतकर्यांना मिळत असल्याने उन्हाळी मिरची लावण्यावर भर आहे.