Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik : अवकाळी पावसाचा फटका; उद्या शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Nashik : अवकाळी पावसाचा फटका; उद्या शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अवकाळी पावासामुळे 132 के. व्ही. सातपुर फिडर सबस्टेशन मध्ये बिघाड झाला असून महावितरणकडून उद्या शुक्रवारी (दि.4) युध्दपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गंगापुर धरण येथुन होणारा पाणी पुरवठा पंपींग करणे शक्य होणार नसल्याने शहराचा सकाळच्या वेळी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असून सायंकाळी कमी दाबाने पुरवठा होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 के. व्ही. सातपुर व महिंद्रा या दोन फिडरवरुन 33 के.व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेण्यात आलेला असुन सदर पंपिंगद्वारे मनपाचे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ. वॉटरचा पुरवठा करणेत येतो.मात्र अवकाळी पावासामुळे 132 के. व्ही. सातपुर फिडर सबस्टेशन मध्ये बिघाड होवून डिस्क इन्शुलेटर आणि पिन इन्शुलेटर बर्स्ट झालेले आहेत. एचटी कन्डक्टर तुटलेले आढळून आले असल्याने सप्लाय बंद ठेवणेत आलेला होता. बिघाड झालेल्या जागी दोन्ही 33 केव्ही लाईन या डबल सर्किट आहेत. त्यामुळे दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक आहे.

दुरूस्ती कामाकरीता विद्युत पुरवठा बंद ठेवणेबाबत महावितरणला कळवले आहे. शुक्रवारी महावितरण कंपनी यांचेमार्फत तातडीने दुरूस्ती कामे करण्यात येणार असल्याने मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे होणारा वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गंगापुर धरण येथुन होणारा पाणी पुरवठा पंपींग करणे शक्य होणार नसल्याने शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र, बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र, निलगीरी बाग जलशुध्दीकरण केंद्र, गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रावरुन सकाळी होणारा पाणी पुरवठा बंद राहिल. दुपारी व सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...