Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबारनंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

नवापूर Navapur। श.प्र.

गेल्या काही दिवसापासून वातावरणात मोठे बदल दिसून येत असून. थंडी कमी झाल्यानंतर आणखी वातावरणात ऊन सावलीचा खेळ सुरू असतानाच. जिल्ह्यीत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर नवापूर तालुक्यासह नंदुरबार (Nandurbar district) तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rains) हजेरी लावली आहे.

- Advertisement -

आज दि.29 फेब्रुवारी रोजी दुपारी नवापूर तालुक्यातील विसरवाडी, खांडबारा व नंदुरबार तालुक्यातील वेळावद, धानोरा आदी गावांमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे.

रब्बी हंगामातील पिके तसेच उघड्यावर असलेला शेतीमाल, गुरांचा चारा याची नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान सायकांळी नवापूर तालुक्यातील वडझाकण परिसरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लावली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....