Saturday, April 12, 2025
Homeदेश विदेशUPI सेवा अचानक डाऊन! यूजर्स हैराण, एका महिन्यात ही दुसरी वेळ

UPI सेवा अचानक डाऊन! यूजर्स हैराण, एका महिन्यात ही दुसरी वेळ

दिल्ली । Delhi

देशभरात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा पुन्हा एकदा बंद पडली आहे. गेल्या दीड तासापासून नागरिकांना यूपीआयद्वारे व्यवहार करताना अडचणी येत आहेत. ही समस्या गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा उद्भवली आहे.

- Advertisement -

डाउनडिटेक्टरनुसार, जवळपास ६८% वापरकर्त्यांना पेमेंट करताना त्रास होत आहे, तर ३१% लोकांना निधी ट्रान्सफर करण्यात अडचण येत आहे. सुमारे १% नागरिकांना खरेदी करताना अडथळे येत आहेत. यापूर्वी २६ मार्च रोजी सुद्धा यूपीआय सेवा सुमारे अडीच तास ठप्प झाली होती. त्यावेळी गुगल पे, फोनपे, पेटीएमसारख्या अ‍ॅप्सवर व्यवहार अयशस्वी होत होते. तसेच, १० पेक्षा अधिक बँकांच्या यूपीआय आणि नेट बँकिंग सेवांवर परिणाम झाला होता. अनेक वापरकर्ते अ‍ॅप लॉगिन आणि नेट बँकिंग प्रवेशही करू शकले नव्हते.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याप्रसंगी स्पष्टीकरण दिले होते की, काही तांत्रिक कारणांमुळे यूपीआय सेवांमध्ये अंशतः अडथळा निर्माण झाला होता. मात्र, समस्या तातडीने सोडवून सेवा पूर्ववत करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या अडचणींबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. वापरकर्त्यांनी संयम ठेवावा, अशी सूचना करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून ५ जण...

0
मुंबई | Mumbai विदर्भातील अकोला जिल्ह्यातील (Akola-District) अकोला-मंगरूळपीर रोडवर (Akola-Mangrulpir Road) दगडपारवा गावाजवळ विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे....