Sunday, September 29, 2024
Homeधुळेप्रार्थनास्थळाची विटंबना करणारे अटकेत

प्रार्थनास्थळाची विटंबना करणारे अटकेत

धुळे । प्रतिनिधी dhule

तालुक्यातील नेर येथे प्रार्थनास्थळाचा विटंबनेचा प्रकार अवघ्या बारा दिवसातच उघडकीस आणून पाच जणांना तालुका पोलीसांनी अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

- Advertisement -

जुन्या भांडणाच्या वादातून विटंबना!

नेर गावातील मुस्लिम बांधव प्रार्थनास्थळात गेल्यानंतर 3 जूनच्या पहाटे विटंबनेची घटना उघडकीस आली होती. घटनेची माहिती मिळताच एसपी संजय बारकुंंड यांनी भेट दिली होती. विटंबना करणार्‍यांना लवकरच अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले होते. तालुका पोलिसांनी रॅपीड कारवाई करून पाच जणांना अटक केली. जुन्या भांडणाच्या वादातून हे कृत्य केल्याचे आरोपींनी म्हटले आहे. दोन गटात तणाव निर्माण व्हावा हा देखील त्यांचा कुटील डाव होता.

विटंबनेच्या घटनेनंतर एकाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून म्होरक्यांचा शोध सुरू होता. संशयित गणेश छोटू शिरसाठ (22) यास पुणे एमआयडीसीतून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने अन्य साथीदार भीमराव सुकलाल कुंवर (36), विक्की नाना कोळी (21), रोहित अरूण जगदाळे (21) व एक अल्पवयीन विधी संघर्ष बालक यांच्यासह कट रचून नेरला विटंबना केल्याची कबुली दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे दत्तात्रय शिंदे, तपास अधिकारी सपोनि.विलास ताटीकोंडलवार, पोसई अनिल महाजन, पोहेकॉ. प्रवीण पाटील, रविंद्र माळी, पोना.प्रमोद ईशी, मुकेश पवार, पोशि.ज्ञानेश्वर गिरासे, अमोल बोरसे, विनायक खैरनार, विनोद गांगुर्डे, पोकॉ.अमोल कापसे, पोशि.प्रमोद पाटील यांनी केली. नेर येथील संवेदनशील घटनेचा तपास तालुका पोलिसांनी उत्कृष्टपणे केला. याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या टीमचे कौतूक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या