Wednesday, January 22, 2025
Homeदेश विदेशUPSC चा मोठा निर्णय! पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही...

UPSC चा मोठा निर्णय! पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई

दिल्ली । Delhi

वादग्रस्त आयपीएस (IPS)अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांना मोठा धक्का बसला आहे. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे.

- Advertisement -

तसेच यूपीएससीने पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकले आहे. पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : UPSC ची धुरा निवृत्त IAS महिलेच्या हाती!

नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांची बाजू मांडण्यासाठी ३१ जुलैपर्यंत वेळ देण्यात आलं होतं. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

हे देखील वाचा : आरोपी दाऊद शेखला पोलीस कोठडी; हत्येचे कारणही सांगितलं

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या