Saturday, June 15, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधील 'या' भागात आज आणि उद्या बत्तीगुल?

नाशिकमधील ‘या’ भागात आज आणि उद्या बत्तीगुल?

नाशिक | Nashik

- Advertisement -

तुम्ही जर नाशिक शहरात किंवा जिल्ह्याच्या भागात राहणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. महावितरण विभागाकडून सलग दोन दिवस म्हणजेच ९ आणि १० सप्टेंबर (शनिवार व रविवार) वीज पुरवटा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये पावसाचे पुनरागमन झाले आहे. या अनुशंगाने नाशिक जिल्ह्यासह शहरवासियांसाठी महत्वाची बातमी आहे. महावितरण विभागातून महत्वाची बातमी येत आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युक पारेषण मंडळाने दिलेल्या माहिती नुसार, अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील विद्युत पुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. किंवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यात विलंब होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे.

जागतिक बँकेकडून पंतप्रधानांचे कौतुक; म्हणाले ५० वर्षांचं काम…

या भागात शनिवारी विद्युत पुरवठा बंद राहणार

सकाळी ५.०० ते सायंकाळी ८.००

ओझर, आडगाव, म्हसरुळ, सिन्नर, अंबर, रा. पिंपळस, एकलहरे, टाकळी या उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या ३२ के.व्ही. वाहिन्यांचा अंशतः विद्युत पुरवठा खंडीत होऊ शकतो.

रविवार दिनांक १०/०९/२०२३

सकाळी ०८.०० ते सायंकाळी ०५.००

ओझर, आडगाव, म्हसरुळ, सिन्नर, अंबर, रा. पिंपळस, एकलहरे, टाकळी या उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या ३२ के.व्ही. वाहिन्यांचा अंशतः विद्युत पुरवठा खंडीत होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या