Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हाधिकार्‍यांची सुरगाणा तालुक्याला तातडीची भेट

जिल्हाधिकार्‍यांची सुरगाणा तालुक्याला तातडीची भेट

नाशिक | सुरगाणा | Surgana

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) गावांनी गुजरातमध्ये (gujrat) जाण्याची भूमिका घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आज तातडीने सुरगाणा तालुक्याला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

प्रलंबित प्रश्न (Pending issues) आणि रखडलेल्या प्रकल्पाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या. सुरगाण्यातील 55 गावांमधील नागरिकांनी थेट गुजरातमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त करीत तसे निवेदन (memorandum) सुरगाणा तहसीलदारांना दिले आहे.

तर या प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीने (Border Conflict Committee) सोमवारी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील (Navsari district) वासदा तहसील कार्यालयात (Vasada Tehsil Office) जाऊ गुजरातमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) नागरिक या मागणीवर ठाम असल्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Collector Gangatharan D) यांनी आज जाऊन येथील परिस्थिती जाणून घेतली. संघर्ष समितीचे पदाधिकारी गुजरात (gujrat) राज्यात गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही मात्र जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन येथील नागरिकांच्या मागण्या जाणून घेतल्या.

मिळालेल्या माहितीनुसार संघर्ष समितीने मांडलेल्या प्रश्नांबाबत तसेच तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, रखडलेले प्रकल्प आणि उपायोजनांबाबतचे प्रस्ताव पुढील दोन दिवसात सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. निधीचे (fund) उपलब्धतेनुसार जी कामे मंजुर करता येणार आहेत अशी कामे तत्काळ मंजुर केली जाणार आहेत.

यावेळी आरोग्य विभागात (Department of Health) रिक्त असलेली पदे पुर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) माध्यमातून तातडीन उपायोजना करण्याचे सुचना देखील त्यांनी केली. आरेाग्य खात्यात काही जागा रिक्त असतील तर त्याही भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळ कमी असेल तर तातडीने मनुष्यबळ पुरविण्याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेला देखील सुचित केले आहे.

जिल्हा परिदेच्या शाळांमध्ये मंजूर पदे तत्काळ पुर्ण करण्यासाठीही कारवाई केली जाणार असून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक वर्ग केली जाण्याची शक्यता आहे. याबरोबरच जलसंधारण कामांची माहिती देखील जिल्हाधिकार्‍यांनी माहिती जाणून घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या