Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक-पुणे रेल्वेमार्ग, मेट्रोसाठी तातडीने निधी द्या - आ.सीमा हिरे यांची अधिवेशनात मागणी

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, मेट्रोसाठी तातडीने निधी द्या – आ.सीमा हिरे यांची अधिवेशनात मागणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सिंहस्थ कुंभमेळा आता अवघ्या दोन वर्षांवर येवून ठेपला आहे.कुंभमेळ्यासाठी देशभरातून रोज हजारो वाहनांमधून लाखो भाविक नाशिकनगरीत येत असतात. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी शासनाने नियो मेट्रो, ड्रायपोर्ट, नाशिक – पुणे लोहमार्ग,शिवसृष्टी या प्रस्तावित प्रकल्पांसाठी भरीव निधीची तरतूद करून प्रकल्प मार्गी लावावे अशी जोरदार मागणी आमदार सीमा हिरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

- Advertisement -

या बरोबरच सिडकोतील घरे फ्री व्होल्ड करण्याची अमलबजावणी करणे,शहरातील अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ करणे,आयटी पार्कला गती द्यावी,इएसआय हॉस्पीटलमधील सुविधांचा अभाव सिडकोत शंभर खाटांच्या हॉस्पीटलची उभारणी करणे या आग्रही मागणींच्या मुद्यावरही प्रकाशझोप टाकत शासनाचे लक्ष वेधले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महायुतीचे सरकार हे सामान्यांचे सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख एक यशस्वी मुख्यमंत्री अशी आहे.मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथजी शिंदे यांनी मांडलेला सात लाख कोटींचाअर्थसंकल्प हा राज्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जाणारा असाच आहे.अर्थसंकल्पात मांडलेल्या गरीबांसाठी घरे,विजेच्या बिलांवर कायम स्वारूपी तोडगा म्हणून सौर उर्जा यंत्रणा,मेट्रोने विमानतळे जोडणे,सव्वीस लाख माहिलांना लखपती करण्याचा संकल्प,दावोस येथे गुंतवणुकीसाठी सोळा लाख कोटींचे करार,महत्वकांक्षी नदीजोड प्रकल्प आदी मुद्यांचा उल्लेख करून आ.हिरेंनी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचे समर्थन केले.

कुंभमेळा मंत्री ना.गिरिष महाजन यांना कुंभमेळ्यासाठी करावयाच्या विकास कामांचा चांगला अनुभव आहे.सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकचे देशभरात ब्रॉडिग होणार असल्याने शहराच्या अंतर्गत वाहतूकीसाठी नियोजित असलेली नियो मेट्रो,शेतकऱ्यांचा शेतीमाल मुंबईत नेण्यासाठी ड्रायपोर्ट,नाशिक – पुणे लोहमार्ग, भाविक आणि पर्यटकांच्या पसंतीला उतरू पाहणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्प,जिल्हासाठी वरदान ठरणारा नदीजोड प्रकल्प या प्रस्तावित प्रकल्पांसाठी भरीव निधीची तातडीने तरतूद करून प्रकल्प मार्गी लावावे अशी जोरदार मागणी आ. सीमा हिरे यांनी अधिवेशनात केली.

या बरोबरच शासनाने यापूर्वी सिडकोतील घरे फ्री व्होल्ड करण्याच्या केलेल्या घोषणेची अमलबजावणी करणे, तुटपुंजा मानधनावर शहरातील महापालिका अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ करणे, नागपूर आधिवेशनात घोषणा केलेल्या आयटी पार्कला गती उभारणीच्या कामाला गती द्यावी,कामगारांसाठीचे ईएसआय हॉस्पीटल सर्व सोयी -सुविधांनी सुसज्ज करावे,सिडकोवासियांसाठी शंभर खाटांच्या हॉस्पीटलची उभारणी करणे आदी आग्रही मागणींचे मुद्दे आमदार सीमा हिरे यांनी मांडले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...