Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजननव्या वर्षात उर्मिला-कंगना यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

नव्या वर्षात उर्मिला-कंगना यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

मुंबई । Mumbai

कंगना रनौत नुकतीच मुंबईत परतली आणि मुंबईत आल्या आल्या तिची टिवटिव सुरु झाली. आता कंगनाने शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

काँग्रेससोडून शिवसेनेत येताच उर्मिला यांनी मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील लिकिंग रोड परिसरात आपल्या कार्यालयासाठी जागा खरेदी केली आहे. या शानदार कार्यालयाची किंमत ३ कोटींपेक्षा अधिक असल्याचे कळते. नेमक्या यावरून कंगनाने उर्मिला यांना लक्ष्य केले आहे. तर, उर्मिला यांनीही कंगनाला सडेतोड उत्तर दिलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईत एक आलिशान कार्यालय विकत घेतले. ही बातमी ट्वीट करत कंगनाने अत्यंत खोचक ट्विट केले. ‘भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिला यांना काँग्रेसमुळं खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वतःच्या मेहनतीनं घर विकत घेतलं होतं. पण काँग्रेस माझं घर तोडत आहे, असा आरोप कंगनानं केला आहे. शिवाय, भाजपला खूष करुन माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खुष केलं असतं,’ असा टोलाही तिनं लगावला आहे.

उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना तिला खडे बोल सुनावले आहेत. उर्मिला यांनी एक व्हिडिओ ट्विट करत कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कंगनाजी, माझ्या बाबतीतचे तुमचे विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशानं ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रं घेऊन मी येते. या कागदपत्रांमध्ये २०११मध्ये स्वतःच्या मेहनतीनं अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा पुरावा मिळेल,’ असा खुलासा उर्मिला यांनी केला आहे. ‘२० – ३० वर्षांच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती. त्याचे पुरावे आहेत. तसंच, मार्च २०२०मध्ये तोच फ्लॅट विकल्याची कागदपत्रं आणि पुरावे असतील. त्याच पैशातून विकत घेतलेल्या ऑफिसची कागदपत्रं असतील. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून ऑफिस विकत घेतलं आहे, हेही दाखवेन,’ असं स्पष्टीकरण उर्मिला मातोंडकर यांनी दिलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...