Friday, June 14, 2024
Homeजळगावचाळीसगाव : मोजक्याच भाविकांच्या उपस्थित तलवार मिरवणूक

चाळीसगाव : मोजक्याच भाविकांच्या उपस्थित तलवार मिरवणूक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

- Advertisement -

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील पीर मुसा कादरी बाबांच्या उरुसाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदाचा ऊरुस भविण्यासाठी परवागी नसली, तरी देखील परंपरेनुसार रविवार (दि,२८) मोजक्याच भाविकांच्या उपस्थित तलवार मिरवणूक काढण्यात आली. तलवार भवानापासून ५ ते १० भाविकांच्या उपस्थितीत तलवार पवित्र दर्गा स्थळावर नेण्यात येणार आली. यंदा तलावर धरण्याचे मान शिवाजी दत्रातय देशमुख यांना मिळला.

दरवर्षाप्रमाणे बँड, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक न काढता साधेपणाने तलवार भवनात(देशमुख वाड्यात) सायंकाळी ५.३० वाजता पूज्य तलवार मातेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यातनतंर यंदा परंपरेनूसार तलवार धरणाचे मानकरणी शिवाजी देशमुख हे पूज्य तलवार धरुन ६.३० वाजेच्या तलवार भवनातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या सोबत विजय देशमुख, अनिल देशमुख, भालचंद्र देशमुख, प्रकश देशमुख, पंजाबराव देशमुख, जितेंद्र देशमुख यांच्यासह इतर उपस्थित होते. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोजक्याच जणांच्या उपस्थितीत तलवार बामोशी बाबांच्या दर्ग्यापर्यंत नेण्यात आली. तलवार मिरवणूकीसाठी गर्दी होवू नये म्हणून, प्रशासनासह पोलिस यंत्रणा अलर्ट दिसून आली.

पीर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबांचा यंदा ७२४ वा ऊरुस आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हे स्थान संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. उरुसाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या ऊरुसमध्ये तलवार मिरवणूक मोठे आकर्षण असते. परंतू यंदा कोरोनामुळे अनेक भाविकांना पूज्य तलवार मातेचे दर्शन घेता आले नाही. परंतू ऊरुसा निमित्ताने दरवर्षाप्रमाणे बाबांच्या दर्गाचेे दर्शन भाविकांना कोरोनाच्या निमावलीचे पालन करुन घेता येणार आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

तलवार मिरवणूकीत गर्दी होवू नये म्हणून चाळीसगाव पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता. दर्ग्यावर ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून पिरसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच ध्वनिक्षेपकावरून फिजिकल डिस्टन्स राखण्याबाबत आवाहन केले जात होते. पोलीस आधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या