Sunday, September 8, 2024
Homeदेश विदेशचीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका चर्चेचे फायदे

चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका चर्चेचे फायदे

नवी दिल्ली

: भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चीनशी सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा संरक्षण करार (2+2 वार्ता )(India-US 2+2 Talks) अतिशय महत्त्वाचा आहे.

- Advertisement -

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांनी थेट चर्चा केली. या चर्चेनंतर सर्वांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. BECA करारामुळे अमेरिका भारताला मदत करणार आहे.

2+2 डायलॉगची हाइलाइट

१) क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारताला अमेरिकेचा डेटा वापरता येणार आहे. आपले टार्गेट निश्चित करण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कुठल्याही ठिकाणांचे अचुक लोकेशन ठरवता येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला आपले लक्ष्य गाठणे सोपे होणार आहे.

२) BECA दोन्ही देशांचे सैन्य गोपनीय माहितीची देवाण-घेवाण वाढवणार आहे. यामुळे भारताच्या क्रूज, बैलिस्टिक क्षेपणास्त्र व ड्रोन सारखे ऑटोमेटेड हार्डवेयर सिस्टमचे महत्व वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या