Monday, July 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUS-Israel and Iran War : अमेरिकेविरोधात पाकिस्तानमध्ये उद्रेक; आंदोलकांचा दूतावासावर हल्ला, ८...

US-Israel and Iran War : अमेरिकेविरोधात पाकिस्तानमध्ये उद्रेक; आंदोलकांचा दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

अमेरिका-इस्रायलकडून (America and Israel) इराणवर (Iran) हल्ले करण्यात येत आहे. आज (रविवारी) या हल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या जावईचा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातील काही देशांच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. तसेच काही विमानांची उड्डाणे देखील रद्द झाली आहेत. इराणवरील या हल्ल्याचे पडसाद भारतात देखील उमटले असून, जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, श्रीनगर येथे शिया समुदायाच्या लोकांनी आंदोलन केले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे पाकिस्तानमध्ये (Pakistan) इराणवर करण्यात आलेला हल्ला आणि खामनेई यांच्या हत्येमुळे अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलनाला (Protest) करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अमेरिकेच्या कराची येथील दूतावासाची तोडफोड केली. आंदोलकांनी दूतावासामध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली. यावेळी आंदोलकांना हुसकावून लावून परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि अमेरिकन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ८ आंदोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

कराचीमधील (Karachi) एम.टी.खान रोड येथे असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासमोर आंदोलक गोळा झाले. यावेळी त्यांनी खामनेई आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यात आल्या विरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, परिस्थिती चिघळली आणि आंदोलकांनी अमेरिकन दूतावासाच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. काही आंदोलक दूतावासात घुसले आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. दरम्यान, जमावाला नियंत्रित करण्यासाठी तिथे असलेले पोलीस आणि अमेरिकन सुरक्षा दलांनी अश्रुधुराचे गोळे सोडले. त्यानंतर थेट गोळीबार गेला.

ताज्या बातम्या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा होरपळून...

0
वर्धा । Wardha 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. वर्धा जिल्हा हद्दीत उभ्या असलेल्या एका इथेनॉलच्या ट्रकला पुण्याकडून येणाऱ्या कारने...