Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाअमेरिकेतील मास्टर्स लीग टी १० स्पर्धा १८ ऑगस्ट पासून

अमेरिकेतील मास्टर्स लीग टी १० स्पर्धा १८ ऑगस्ट पासून

नाशिक | Nashik

अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार् नुकताच पार पडल्यानंतर अमेरिकेमध्ये मास्टर्स टी १० लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे.ही स्पर्धा १८ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. सर्व सामने १० षटकांचे होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने राऊंड रोबिन फॉरमॅट नुसार होणार आहेत.

- Advertisement -

स्पर्धेत एकूण २५ सामने खेळविण्यात येणार आहेत. यामध्ये साखळी फेरीत २१ तर बाद फेरीचे ४ सामाने होतील.या लीगमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर, हरभजनसिंग, युसुफ पठाण,सुरेश रैना,महंमद कैफ, शाहीद आफ्रिदी या दिग्गजांचा समावेश असणार आहे.

खड्ड्यांच्या मुद्यांवर राज ठाकरेंची आक्रमक भूमिका; म्हणाले…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला नावलौकिक प्राप्त केल्यानंतर अमेरिकेत आपली छाप पाडण्यासाठी सर्व खेळाडू सज्ज असणार आहेत. स्पर्धेत एका दिवसात ३ सामने खेळविण्यात येणार आहेत. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३०,८:४५,१०:४५ वाजता खेळवण्यात येणार आहेत.

थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्स वाहिनी वर करण्यात येणार आहे.या स्पर्धेत न्यूजर्सी टायटन्स, मॉरिस विले युनिटी, कॅलिफोर्निया नाईटस्,अटलांटा रायडर्स, न्यूयॉर्क वॉरियर्स, टेक्सास चार्जरस या संघाचा समावेश असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या