नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अटकेचा एआय-जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये एफबीआय एजंट्सनी अटक केल्याचे दाखवले आहे.
व्हिडिओमध्ये ओबामा ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. त्यानंतर 3 एजंट येतात. एजंट ओबामा यांचा कॉलर पकडून त्यांना खाली ढकलतात आणि त्यांना बेड्या ठोकतात. जवळ बसलेले ट्रम्प हे सर्व पाहून हसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी, ओबामा तुरुंगाच्या गणवेशात एका कोठडीत दिसत आहेत. या व्हिडीओची सुरुवात ओबामा यांच्या एका जुन्या विधानाने होते –”कोणीही, अगदी राष्ट्राध्यक्षसुद्धा, कायद्याच्या वर नाही.” त्यानंतर अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांच्या क्लिप्स दिसतात. त्यामध्ये ज्यो बायडेनदेखील याच विधानाची पुनरावृत्ती करताना दिसतात.
यानंतर व्हिडीओमध्ये दिसते की, बराक ओबामा हे ट्रम्प यांच्या शेजारी बसले आहेत. इतक्यात FBI चे तीन एजंट येतात, आणि चक्क ओबामांच्या शर्टाची कॉलर पकडतात, त्यांना ढकलून खाली पाडतात आणि हातकड्या घालतात. हे सगळे होताना ट्रम्प बराक ओबामा यांच्या बाजूलाच बसून हसताना दिसतात. शेवटी, ओबामा हे तुरुंगातील युनिफॉर्ममध्ये एका तुरुंगाच्या कोठडीत दिसून येतात. पण, थांबा. ट्रम्प यांचे वागणे विक्षिप्त वाटणारे असले तरी अद्याप त्यांनी अशाप्रकारचे काहीही केलेले नाही. कारण हा व्हिडिओ खरा नाही. तर पूर्णपणे AI जनरेटेड (कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेला) आहे.
दरम्यान, या व्हिडिओबद्दल ट्रम्प यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही की हा व्हिडिओ खोटा आहे. या व्हिडिओमुळे ट्रम्प यांच्यावर खूप टीका होत आहे. अनेकांनी याला ‘प्रक्षोभक’ म्हटले आणि असे खोटे व्हिडिओ शेअर करणारे अध्यक्ष लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतात असे म्हटले. काही जण असेही म्हणतात की एपस्टाईन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.
ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वीच असा आरोप केला होता की, ओबामा प्रशासनाने २०१६ मध्ये ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूकीत फसवणुकीचे कटकारस्थान रचले होते. यावरूनच अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी एक मोठा दावा केला की, ओबामा व त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून ट्रम्प यांच्याविरोधात देशद्रोही कट रचला. या कटाचा उद्देश असा होता की ट्रम्प यांचा निवडणुकीतील विजय रशियाच्या मदतीने झाल्याचे सिद्ध करणे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




