Thursday, June 20, 2024
Homeदेश विदेशभीषण अपघात! इलेक्ट्रिक बसने प्रवाशांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू

भीषण अपघात! इलेक्ट्रिक बसने प्रवाशांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू

कानपूर | Kanpur

- Advertisement -

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील कानपूर (Kanpur) येथे रविवारी रात्री भीषण अपघाताची (Terrible accident) घटना घडली आहे.

कानपूरमध्ये एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने अनेक प्रवाशांना चिरडले. कानपूर टाट मिल चौराहा येथे झालेल्या या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अनेक जखमींना रुग्णालयात दाखल केले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी चौकात मोठी गर्दी होती त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

दरम्यान, मृत पावलेल्यांपैकी तिघांची ओळख पटली असून इतरांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान यांची ओळख पटली आहे. जखमींवर टाटमिल येथील कृष्णा हॉस्पीटल आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या