Saturday, July 13, 2024
Homeभविष्यवेधउत्तरप्रदेशचे बुलडोझर बाबा!

उत्तरप्रदेशचे बुलडोझर बाबा!

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंडमध्ये झाला. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून संन्यास घेतला. त्यांनी विज्ञान वर्गापासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. विद्यार्थी जीवनात ते विविध राष्ट्रवादी चळवळींशी संबंधित होते.

- Advertisement -

महायोगी गुरु गोरक्षनाथ आणि त्यांच्या तपस्येचे ठिकाण गोरखनाथ मंदिर. गोरखपूरचे हिंदू धर्म, तत्वज्ञान, अध्यात्म आणि ध्यान या अंतर्गत विविध पंथ आणि संप्रदायांमध्ये नाथ पंथाचे प्रमुख स्थान आहे. भारतातील असे एकही राज्य, प्रदेश किंवा जिल्हा नाही ज्याला नाथसंप्रदायातील सिद्धांनी किंवा योगींनी आध्यात्मिक साधना आणि तत्त्वज्ञानाच्या वैभवाने पवित्र केले नाही. देशाच्या कानाकोपर्‍यात वसलेली तीर्थक्षेत्रे, मंदिरे, मठ, आश्रम, दलिचा, गुहा आणि टेकड्या हे नाथ समाज भारतातील अत्यंत तेजस्वी प्रभविष्णू, क्रांतिकारी आणि राजवाड्यांपासून ते सर्वत्र पसरलेले असल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. लोकप्रिय धर्म हा मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारा मुख्य धर्म आहे. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि विकासाच्या मूलभूत रचनेचे राजकारणावरील अवलंबित्व यामुळे गोरक्षपीठ यांना राजकीय क्षेत्रात उतरण्यास भाग पाडले. ज्याचे कार्य योगींचे आजोबा गुरु ब्रह्मलीन महंत परमपूज्य दिग्विजयनाथजी महाराज आणि परमपूज्य महंत अवेद्यनाथजी महाराज यांनी केले. ही परंपरा पुढे चालवताना योगी आदित्यनाथ यांनी 1998, 1999, 2004 आणि 2009 या वर्षांमध्ये गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि राजकारणात आध्यात्मिक शुद्धतेचे उच्च मापदंड प्रस्थापित केले.

योगी आदित्यनाथ हे संन्यासी आणि भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते उत्तर प्रदेशचे सर्वाधिक काळ पद भूषविणारे मुख्यमंत्री देखील आहेत. 2022 पासून उत्तर प्रदेश विधानसभेत गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2017 ते 2022 पर्यंत ते उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते.

योगी आदित्यनाथ हे गोरखपूर येथील हिंदू मठातील गोरखनाथ मठाचे महंत (मुख्य पुजारी) देखील आहेत. महंत अवैद्यनाथ, त्यांचे आध्यात्मिक वडील यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2014 पासून ते या पदावर होते. ते हिंदू युवा वाहिनी या हिंदू राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक देखील आहेत. त्यांची प्रतिमा हिंदुत्ववादी आणि सामाजिक रूढीवादी अशी आहे. योगी आदित्यनाथ यांच्या हातावरचा भविष्यवेध आज आपण पहाणार आहोत. त्यात योगी संन्यासी का आहेत, धार्मिक व आध्यात्मिक बैठक कशामुळे आहे, नेतृत्व क्षमता व उत्तर प्रदेशचे सलग दोन वेळेस मुख्यमंत्री पद लाभले तो राजयोग कोणत्या ग्रह रेषेमुळे प्राप्त आहे, अशा विविध पैलूंचा अभ्यास हस्तसामुद्रिकशास्त्राद्वारे जाणून घेणार आहोत. योगीजींचे भविष्य पाहताना एकाच हाताचा फोटो न देता त्यांच्या दोनही हातांच्या विविध फोटोंद्वारे, ग्रह रेषा, चिन्हे व त्यांचे कारकत्व पाहणार आहोत. याद्वारे हस्तरेखाशास्त्र किती अचूक आहे, याची प्रचिती वाचकांना येणार आहेत. त्यांना बुलडोझर बाबा का म्हणतात, त्यांचे निर्णय इतके झटपट कसे, इत्यादी त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुण कोणत्या ग्रह रेषेने बहाल केले ते अभ्यासणार आहोत.

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश सरकारमधे सलग दुसर्‍यांदा मुखमंत्री आहेत. योगींकडे परिवार नाही, कुटुंब नाही, वैवाहिक सेौख्य नाही कारण ते संन्यासी आहेत. त्यांना धन कमावण्याची लालसा नाही, पुढच्या पिढीसाठी गडगंज संपत्ती ठेवायची नाही, महाल बांधावयाचे नाही, पुढच्या पिढीला राजकारणात उतरवायचे नाही आणि म्हणूनच योगी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे योगदान धार्मिक व सामाजिक कामासाठी देत आहेत. ती त्यांच्या जीवनातील प्राथमिकता आहे. योगी यांच्या या सर्व आयुष्याच्या जीवनपटाचा नकाशा योगी यांच्या हातावर आहे. योगी यांच्या हातावरील ग्रह, रेषा, चिन्हे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जे त्यांच्या बोेटांच्या, हाताच्या व अंगठ्याच्या ठेवणीमुळे आहे. संपूर्ण हाताची रचना आयुष्यातील त्यांचे भाग्य व कर्म यांचा परिचय हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार विशद केला आहे. योगी यांच्या हातावर विवाह रेषा आहे. त्यांचेकडे त्या भावना आहेत. परंतु वैवाहिक सौख्याच्या किंवा सांसारिक सुखाच्या भावना तीव्र नाही. कारण विवाहरेषा स्पष्ट व गडद नाही. वैवाहिक सुखाच्या भावना असल्या तरी आध्यात्मिक, धार्मिक भावना या ऐहिक व सांसारिक सुखापेक्षा श्रेष्ठ असल्याने ते ब्रह्मचारी आहेत. योगी यांच्या हातावरील शुक्र ग्रहाचा उभार मोठा असला तरी त्यापेक्षा चंद्र ग्रहाचा उभार मोठा व शुक्र ग्रहांपेक्षा मनगटाकडे जास्त मोठा आहे. चंद्र ग्रहाचा उभार मोठा असल्याने मनावर ताबा आहे. कल्पना मोठ्या आहेत. या सर्व कल्पनेप्रमाणे व नियोजित कामांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हातावरील अंगठा मजबूत आहे. अंगठ्यावरची दोन्ही पेरे प्रमाणात असल्याने पहिल्या पेर्‍यातून नियोजित केलेल्या कामाची अंमलबजावणी दुसर्‍या पेर्‍याने तात्काळ करण्याची प्रवृत्ती आहे. कारण अंगठ्याच्या पहिल्या व दुसर्‍या पेरांवर आडव्या रेषा नाहीत. अंगठ्यावरील आडव्या रेषा असतील तर त्या नियोजित कामाची त्वरित अंमलबजावणी होऊ देत नाहीत, निर्णय लवकर होत नाही व आळस असतो.

ते बुलडोझर बाबा म्हणून उत्तर प्रदेशात प्रसिद्ध आहेत. माफिया, सराईत गुन्हेगार, शुटर, गँगस्टर यांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर घालून जमीनदोस्त करण्याची पद्धत त्यांनी अवलंबली. योगी झटपट निर्णय घेतात. उत्तर प्रदेशातून माफिया, सराईत गुन्हेगार,शुटर, गँगस्टर समूळ नष्ट करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.

हातावर आयुष्य रेषेच्या आत वय वर्ष 25 पासून वय वर्ष 80 पर्यंत मंगळ रेषा आहे. आयुष्य रेषेच्या आतील मंगळ रेषा योगी यांना दिवसाचे अठरा तास उत्साहात काम करण्याची क्षमता प्रदान करत आहे. मंगळ रेषा असता असे लोक शीघ्रकोपी असतात. यांना खोटेपणाचा, लबाडीचा मनस्वी राग येत असतो. आयुष्य रेषेच्या आतील मंगळ रेषा वरच्या मंगळ ग्रहावरून उगम पावल्याने या मंगळ रेषेत धाडसी व आक्रमक गुण समाविष्ट आहेत. त्यामुळेच योगी बुलडोझर बाबा म्हणून प्रसिद्ध झाले.

त्यांच्या हाताच्या फोटोत सर्वात आधी लक्ष जाते ते मजबूत अंगठ्याकडे. मजबूत अंगठा असता असे लोक दुसर्‍याच्या अधिपत्याखाली काम करू शकत नाहीत. मजबूत अंगठा आपल्या तत्व-ज्ञानानुसार काम करण्यास उद्युक्त करतो. दुसर्‍याचे ऐकून घेण्याची यांची प्रवृत्ती नसते. हातावरील रेषा व त्यांचा उगम व शेवट हा हस्तरेखाशास्त्रानुसार आहे. हातावरील मुख्य रेषा स्पष्ट, तलम, एकसारख्या पोताच्या, हाताच्या रंगापेक्षा थोड्या गडद, तळहातात किंचित खोल व चमकदार असल्याने योगी त्यांचे भाग्यात भर घालणार्‍या आहेत. हातावर आडव्या रेषा नाहीत. भाग्य रेषा मनगटातून उगम पावते आहे व ती आयुष्य रेषेच्या फाट्यात विलीन होऊन मधल्या शनी ग्रहाकडे मार्गस्थ झाली आहे. ही भाग्य रेषा शनी ग्रहावर मधोमध न जाता ती शनी ग्रहावर शनी ग्रहाच्या बोटाच्या कडेला व रवी ग्रहाच्या सानिध्यात जाऊन थांबली आहे. भाग्य रेषा बोटांच्या पेर्‍यात जाऊन थांबत असेल तर अश्या व्यक्तीं कडे स्वतःची धन दौलत, बँक बॅलन्स चरितार्थापुरता असतो व यांचे जीवमान अत्यंत साधे वैराग्यपूर्ण असते.

त्यांचा डावा हात हा अत्यंत भाग्यशाली आहे. या हातावर संन्यासी होणार हे भाग्य रेषा गुरु ग्रहावर जाऊन पोहोचल्याने अधोरेखीत केले आहे. भाग्य रेषा गुरु ग्रहावर गेल्याने असे लोक सामाजिक धार्मिक कामासाठी आयुष्यभर कार्य करीत असतात व आपली संपूर्ण पुंजी दानधर्मासाठी वापरतात. भाग्य रेषा ज्या ग्रहावर जाऊन थांबते त्या ग्रहाच्या कारकत्वाचा लाभ होत असतो. उजव्या हातावर शनी ग्रहाच्याकडेला रवी ग्रहाच्या बाजूने भाग्य रेषा पेर्‍यात जाऊन रुतल्याने त्यांची कमाई नसताना त्यांना केवळ राज्याचे मुखमंत्री असल्याने व देवस्थानचे मुखिया असल्याने मानसन्मान आपोआपच प्राप्त होत आहे. भाग्य रेषेचा उगम आयुष्य रेषेच्या आत शुक्र ग्रहावरून होत असल्याने त्यांना आयुष्यात स्वतःची कमाई अल्प असली तरी, त्यांना त्यांच्या जीवनात उत्तम व प्रशस्त वास्तूचा लाभ, दिमतीला नोकर चाकर व वाहन, सरकारी खर्चात संरक्षण इत्यादीचा लाभ, त्यांच्या देवस्थानकडून व सरकारकडून आयुष्यभर मिळत राहणार आहे. हृदय रेषा गुरू ग्रहावरून उगम पावत असल्याने गुरू ग्रहाचे सर्व शुभ गुण प्राप्त झाले आहेत. यात विशेषतः सहृदयी मन, उच्च कोटीच्या नि:स्वार्थ भावना लाभल्या आहेत.

डावा व उजवा हात, अंगठा व पहिले बोट एकत्रित आल्याने त्यांच्या हातावरील ग्रहांचे उभार मोठे असल्याने हातावरील सर्व ग्रह शुभ कारकत्वाचे आहेत. शुक्र व चंद्र ग्रहांचा उभार विशेषतः गुबगुबीत व नजरेत भरणारा आहे. हात मुलायम व स्निग्ध आहेत. हातावर आडव्या रेषांचा अभाव आहे. उजव्या हातावरची भाग्य रेषा मणिबंधापासून उगम पावली आहे. मणिबांधाखाली भाग्य रेषेपासून एक चर किंवा खोलगट भाग आहे. हा भाग्य रेषेच्या उगमापाशी असल्याने अलौकिक खोलगट भाग मी कधीही पाहिलेला नाही. बोटे तळहातापेक्षा आखूड असल्याने मागचा पुढचा विचार न करता नैतिकतेच्या चौकटी, जलद अंमलबजावणी व निर्णयक्षमता प्राप्त झाली आहे. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर न जाता वरच्या मंगळ ग्रहाकडे गेल्याने विचारपूर्वक पण तुरंत निर्णय घेण्याचे गुण प्राप्त आहेत. उजव्या हातावरची बुध रेषा हुशारीची व चलाखिची आहे. त्यामुळे ते मीडियात कायम चर्चेत असतात. भाग्य प्रबळ आहे. सामाजिक कार्य दैदिप्यमान आहे. ते अत्यंत हुशार, विद्वान व चलाख आहेत. सध्या ते अवघे 51 वर्षांचे असल्याने त्यांचे समर्थक त्यांना भारताचे भावी पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहू इच्छितात!

- Advertisment -

ताज्या बातम्या