Saturday, April 26, 2025
Homeदेश विदेशBadrinath Dham : हर हर महादेव ! बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले

Badrinath Dham : हर हर महादेव ! बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले

नवी दिल्ली | New Delhi

केदारनाथ मंदिरानंतर आज भगवान बद्री विशालचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले आहेत. बद्रीनाथ यात्रेबाबत (Badrinath Yatra) भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

- Advertisement -

बद्रीनाथ धामची कवाडं आज सकाळी वैदिक मंत्रोच्चारात उघडण्यात आले. लष्करी बँड, आयटीबीपीच्या बँडसोबतच गढवाल स्काऊट्सनेही यावेळी परफॉर्म केले आणि भाविकांच्या जय बद्री विशालच्या घोषणांनी दरवाजे उघडण्यात आले. बद्रीनाथच्या दर्शनासाठी शेकडो भाविक मंदिर परिसरात जमा झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा आणि आरती करण्यात आली. दरवाजे उघडण्यापूर्वी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मंदिरात पोहोचले होते. यावेळी मंदिराला 15 टनांपेक्षा जास्त फुलांनी सजवण्यात आले आहे.

उसने पैसे परत मागितल्याने, तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला

दरवाजे उघडताना हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. बद्रीनाथच्या सिंह दरवाजापासून यात्रेकरूंच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे. दरवाजे उघडल्यानंतर सुमारे 20 हजार यात्रेकरू धाममध्ये पोहोचले आहेत. दरवाजांच्या उद्घाटनासाठी माधव प्रसाद नौटियाल हे टिहरी राजाचे प्रतिनिधी म्हणून धाममध्ये उपस्थित होते.

ठाकरे गट, राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; मंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर उत्तराखंडमध्ये चार धामची यात्रा सुरू झाली आहे. टिहरी नरेश हा दिवस निवडतात जी जुनी परंपरा आहे. माजी धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल सांगतात की, बद्रीनाथ धामचे दरवाजे वैशाख सुरू झाल्यापासून उघडले जातात आणि परंपरेनुसार नरेंद्र नगरच्या टेहरी नरेशची तारीख निश्चित केली जाते. परंपरेनुसार येथे मनुष्य 6 महिने भगवान विष्णूची आणि 6 महिने देवतांची पूजा करतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या