Thursday, January 8, 2026
Homeदेश विदेशUttarakhand Bus Accident: उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; अनेकांचा मृत्यू...

Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तराखंडमधील अल्मोडा येथे प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. मार्चुला परिसरात प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये ४० हून अधिक लोक प्रवास करत होते. बस दरीत कोसळल्याने आत्तापर्यंत २० जणांचा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, २० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एसडीआरएफ आणि पोलिसांचे बचाव कार्य सुरु आहे, असे वृत्त एका संस्थेने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज न आल्यामुळे सकाळी बस दरीत कोसळली. गीत जागीर नदीच्या किनाऱ्याला बस दरीत कोसळल्यामुळे अनेकजणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सकाळी नऊच्या सुमारास जखमी प्रवाशांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी सांगितले की, मीठ आणि रानीखेत येथून पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्‍यात आले आहेत.

- Advertisement -

४२ आसनी बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते. बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी घडली. या अपघातानंतर काही प्रवासी स्वतः बसमधून बाहेर आले. काही लोक बसमधून घाबरुन खाली पडले. या अपघातमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांनी या दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...