Thursday, April 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहेश मांजरेकर यांना 'व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार' जाहीर

महेश मांजरेकर यांना ‘व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा चित्रपती ‘व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ नामवंत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. तर यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना घोषित करण्यात आला आहे. प्रत्येकी १० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या २५ एप्रिल रोजी एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे एका भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

- Advertisement -

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली.

त्यानुसार हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे १० लाख आणि ६ लाख रुपये, स्मृतिचिन्ह तसेच मानपत्र, चांदीचे पदक असे आहे.

चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून सहा लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार्थीची निवड करण्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर समिती नेमण्यात आली होती. या समितीत पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र आदींचा समावेश होता.

२० एप्रिलला संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम
दरम्यान, या सोहळ्याशिवाय संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश आणि नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी यावेळी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांच्या बदलीला...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची (Malegaon Bomb Blast Case) सुनावणी (Hearing) करणारे विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या...