Tuesday, November 5, 2024
Homeमुख्य बातम्याशिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करा

शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त करोना प्रतिबंधात्मक ( corona Vaccines ) लसीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

- Advertisement -

त्यामुळे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनापूर्वी ( Before Teachers Day ) सर्व शालेय शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia ) यांनी राज्यांना दिले आहेत.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च 2020मध्ये देशव्यापी लॉकडाउन लावण्यात आले होते. त्याच्या काही दिवस आधीपासूनच देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती.

त्यानंतर केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या