Friday, April 25, 2025
Homeनगरलस घेतल्यानंतर बाळाचा मृत्यू

लस घेतल्यानंतर बाळाचा मृत्यू

पुणतांबा ग्रामीण रुग्णालयातील घटना, चुकीची लस दिल्याचा नातेवाईकांचा आरोप || अकस्मात मृत्यूची नोंद

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणताांबा ग्रामीण रुग्णालयात लसिकरण केल्यानंतर काही वेळाने दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.एस. बांगर यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात दर सोमवारी नवजात बालकांना लसीकरण केले जाते. पिंटु किरण आरणे या दीड महिन्याच्या बालकास सकाळी लसीकरण करून घरी पाठविण्यात आले. घरी गेल्यानंतर अर्धा तासाने बाळाची हालचाल मंदावली. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत या बाळास उपचार करण्यासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात आई गायत्री आरणे घेऊन आली.

- Advertisement -

बाळाची तपासणी केली असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. एस. बांगर यांनी त्यास मयत घोषित केले. यावर बाळाची आई गायत्री आरणे हिने एकच टाहो फोडला. लसीकरण करणार्‍या आरोग्य सेविकांनी निष्काळजीपणे चुकीची लस दिली असे म्हणत सर्वांना धारेवर धरले. वैद्यकीय अधिक्षकासह आरोग्य कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाळाच्या आईसह नातेवाईकांनी केली. याबाबतची माहिती रुग्णालयाकडून राहाता पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पुणतांब्यात जावून रूग्णालयाला भेट देत नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल, असे आश्वासन दिले.

पोलिसांनी लसीकरण रजिस्टर, दिलेली लस व इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्र ताब्यात घेतले. बाळाचे शवविच्छेदन करणे, लसीची उच्चस्तरीय शासकीय लॅबमध्ये तपासणी करणे आवश्यक असून याकरिता बाळाला नातेवाईकासह शासकीय रुग्णालय अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले. सिव्हील सर्जन यांच्याकडून येणारा शवविच्छेदन अहवाल व लसीचा तपासणी अहवालानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक गलांडे यांनी नातेवाईकांना सांगितले. आरोग्य विभागाचा अहवाल काय येतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. याबाबत राहाता पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू रजि. नं. 85/2024 बीएनएनएस 194 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण साळुंके करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...