Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्याडेंग्यू आणि मलेरियावर वर्षभरात बाजारात लस

डेंग्यू आणि मलेरियावर वर्षभरात बाजारात लस

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

जगभरात हाहाकार माजवणार्‍या करोनावर लस निर्माण करुन जगाला संजीवनी देणार्‍या भारताच्या सीरम इन्स्टिट्युटने देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात आली होती. आता सीरम इन्स्टिट्युटने डेंग्यू आणि मलेरिया या आजारांवर लस तयार करण्यात यश मिळवले आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरम इस्टिट्युटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

या नवीन लसीची आफ्रिकन आणि भारत देशात अत्यंत आवश्यकता आहे. ज्याठिकाणी लाखो लोक या आजाराने संक्रमित होतात असे सायरस पूनावाला यांनी म्हटले आहे. कोविशील्डच्या यशानंतर जगात पहिल्यांदाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मलेरिया, डेंग्यूवर लस विकसित करणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या व्हॅक्सिनवर काम करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सीरमने एक रिपोर्ट समोर आणला. ज्यात एका माणसाला डेंग्यूची लस देण्यात आली. ती सुरक्षित आणि चांगले परिणाम देणारी ठरली. डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सातत्याने चाचणी करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची जी लस वर्षभरात आणणार असल्याचे सांगितले, त्यात डेंग्यूच्या सर्व स्ट्रेनचा उपचार होणार आहे. सीरमकडून लवकरच ही व्हॅक्सिन बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये देशातील औषध प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. सीरमने तिचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी यूएसमधील बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत एकत्र येऊन काम केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या