Monday, June 17, 2024
Homeनगरवडाळा महादेव परिसरात ट्रॅक्टर डबल ट्रॉली व चार चाकी वाहनाचा भीषण अपघात

वडाळा महादेव परिसरात ट्रॅक्टर डबल ट्रॉली व चार चाकी वाहनाचा भीषण अपघात

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील एका धार्मिक आश्रमाच्या कमानीसमोर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर डबल ट्रॉली व चार चाकी वाहनाचा अपघात झाला आहे.

काल सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नांदेडकडून स्विफ्ट कार एमएच 26 इटी 5087 हे वाहन नाशिकच्या दिशेने जात होते. यामध्ये ड्रायव्हर रामराव वाघमोडे (वय 30) रा. सावरगाव, तालुका भोकर, जिल्हा नांदेड ते वाहन चालवत होते. तर माधव सोनटक्के व त्यांचा मुलगा शिवकुमार सोनटक्के हे नाशिक येथे एमबीबीएस अ‍ॅडमिशन करता जात होते तर त्यांना समोरून भरधाव वेगात येणार्‍या उसाच्या ट्रॅक्टरने जोराची धडक मारली.

यावेळी स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर वाहन पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना जोराची धडक बसल्याने गाडीचे तोंड पश्चिमेकडून दक्षिणेकडे झाले आहे. यामध्ये ड्रायव्हरला जबर मार लागल्याने तसेच माधव सोनटक्के व शिवकुमार सोनटक्के यांना छातीला व हाताला मुका मार लागला आहे. यामध्ये ट्रॅक्टर चालकाने अपघात होताच तिथून पळ काढला, घटनेची माहिती ग्रामस्थांकडून व प्रवाशांकडून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कळविण्यात आली.

त्यानुसार पोलीस नाईक संजय दुधाडे अंमलदार दत्तात्रय दिघे, राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत श्री. सोनटक्के व चालक वाघमोडे यांना तात्काळ वडाळा महादेव येथील रुग्णवाहिकेच्या मदतीने साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी ड्रायव्हरला जबर मार लागला आहे.

प्रसंगी ट्रॅक्टरने जोराची धडक देऊन दोन्ही ट्रॉलीसह रस्त्याच्या विरुद्ध दिशेला खड्ड्यात उतरला आहे. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना देण्यात आली त्यानुसार आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, एपीआय संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक संजय दुधाडे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या