Monday, March 17, 2025
HomeजळगावPhotos #येवती येथे वदगी मिरवणूक

Photos #येवती येथे वदगी मिरवणूक

विनोद शिंदे

येवती Yevati

- Advertisement -

तालुक्यातील येवती (Yevati) येथील बहीरोबा महाराज (Bahiroba Maharaj) यांची वद्गी मिरवणूक (Vadgi procession) शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारे येथील धनगर समाज वस्तीतुन काढण्यात आली.

या वेळी मोठ्या संख्येने महिला पुरूष येथेल या मिरवणूकीत सहभागी झाले होते. दरम्यान ही 400 वर्षाची अखंड परंपरा असुन दर वर्षी पोळ्या नंतर च्या दुसर्‍या दिवशी येथे वद्गी मिरवणूक काढण्यात येते. शनिवारी मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली. यात वद्गी च्या समोर भारूड चे गायन करण्यात आले. महिलांच्या वतीनेही भक्तिपर गीतांचे गायन करण्यात आले. वद्गी च्या समोर महिलांच्या वतीने पाणी व पुष्प टाकुन स्वागत करण्यात आले. या वद्गी मिरवणुकीत भाविकांच्या वतीने गुलांलाची उधळण करण्यात आली.

दरम्यान शेकडो वर्षांची परंपरा असल्याने ही परंपरा अखंड ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसुन आला. ही वद्गी बैल गाडी वर काढण्यात आली. यात वद्गी धारक विश्वनाथ धनगर यांनी पारंपरिक वेशभूषा करून या वद्गी वर स्वार झाले. गावातील प्रत्येक चौकांमधे वद्गी च्या पाच पाच फेर्‍या मारल्या.

यावेळी गावातील मोठ्या संख्येने सर्व समाजाचे ग्रामस्थ या वद्गी मिरवणुकीत सहभागी झाले होते. यात दत्तु धनगर , संजय जंगले, डॉ. आनंद माळी, राजेंद्र शिंदे , विकास शिंदे , शिवाजी वाघ , प्रमोद विसाळे , आत्माराम काटकर , बबलु ठाकुर , प्रल्हाद वाघ , क्रुष्णा वाघ , राजाराम जंगले , वासुदेव काटकर, जितेंद्र ठाकुर, गजानन सावरीपगार, नारायण ठाकूर, रोहिदास काटकर, पितांबर बावस्कर, सोपान वाघ , निवुत्ती वाघ, मधुकर माळी, आनंद माळी, शांताराम जंगले, कडू सुकाळे, आनंदा अहिर, अशोक सावरी पगार या मिरवणुकीत सहभागी होते.

ही मिरवणूक वाजत गाजत भारूडाचे गायन करित संपूर्ण गावातुन ही मिरवणूक बहीरोबा मंदीराजवळ आल्या नंतर बहीरोबा महाराज यांची सामुहिक आरती करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

83 दिवसांत गाळप हंगाम आटोपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2024- 25 चा साखर हंगाम अगदी सुरुवातीपासूनच ऊस उपलब्धता आणि अपेक्षीत साखर उत्पादनाच्या सतत बदलत गेलेल्या आकडेवारीच्या गर्तेत अडकलेला होता. साखर उत्पादनाची...