Friday, May 31, 2024
Homeदेश विदेशआता Tesla वर वैभवराज! एलन मस्कच्या कंपनीच्या खजिन्याची चावी भारतीयाकडे

आता Tesla वर वैभवराज! एलन मस्कच्या कंपनीच्या खजिन्याची चावी भारतीयाकडे

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अशलेल्या टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर एक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘टेस्ला’ने वैभव तनेजा यांची चीफ फायनॅनशिएल ऑफिसर म्हणजेच सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

वैभव तनेजा यांच्या नियुक्तीमुळे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे.

कोण आहेत वैभव तनेजा?

वैभव हे टेस्लासोबत २०१६ पासून काम करत असून २०१६ मध्ये मस्कच्या कंपनीने सोलारसिटी ताब्यात घेतली तेव्हा ४५ वर्षीय वैभव टेस्लाशी संबंधित होते. वैभव यांना जानेवारी २०२१ मध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक बनवण्यात आले, जे टेस्लाचे भारतीय युनिट आहे.

त्यांना लेखापालनाचा दोन दशकांहून अधिक अनुभव असून वैभवने आपल्या करिअरमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. टेस्ला येथे सध्याच्या भूमिकेपूर्वी त्यांनी कॉर्पोरेट कंट्रोलरची जबाबदारी सांभाळली होती.

Sanjay Raut : “लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार”; संजय राऊतांचे विधान

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर १९९६ मध्ये वैभव तनेजा यांनी प्रथम प्राइस वॉटरहाऊस कूपर्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. भारतीय कार्यालयात रुजू झाला त्यानंतर त्यांना अमेरिकेच्या कार्यालयात हलवण्यात आले.

तनेजा यांनी कंपनीचे माजी सीएफओ दीपक आहुजा आणि जॅचरी किर्खॉर्न यांच्यासोबत काम केले आहे. करताना कंपनीचे तिमाही निकाल आणि यूएस आणि आंतरराष्ट्रीय नियंत्रणाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वित्त, रिटेल आणि दळणवळण क्षेत्रात काम केले. वैभव तनेजा यांची जानेवारी २०२१ मध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, टेस्लाची भारतीय शाखा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

IND vs WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज तिसरा T20 सामना आज, पुनरागमन करण्याची भारताला शेवटची संधी

- Advertisment -

ताज्या बातम्या