Saturday, May 4, 2024
Homeनगरवैजापुरात चोरट्यांनी एक लाख रुपयांची बॅग पळविली

वैजापुरात चोरट्यांनी एक लाख रुपयांची बॅग पळविली

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर शहरात भरदिवसा बँकेतून रोख रक्कम काढून गावाकडे निघालेल्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याची पैसे असलेली बॅग लंपास केल्याची घटना काल दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, बबन कडूबा चन्ने हे आपले मित्र मनसू धुळे (दोघेही रा. सवंदगाव) यांच्यासमवेत मोटरसायकलने वैजापूरला आले होते. यावेळी चन्ने यांनी स्टेशन रोडवरील एसबीआय म्हसोबा चौक बँक शाखेतून 1 लाख 13 हजार रुपये काढले व ते पैसे आपल्या बॅगमध्ये ठेवून बॅग मोटरसायकलला लटकून आपल्या मित्रासोबत पुन्हा सवंदगाव येथे निघाले.

परतत असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोटारसायकल पंक्चर झाली असल्याचे त्यांना सांगितले. ज्यामुळे त्यांनी दुचाकी खाली उतरत दुचाकी वळवून लोटत पुन्हा वैजापूरकडे पंक्चर काढण्यासाठी जात असता स्टेशन रोडवरील सावता गिरणीसमोर दुचाकी पंक्चर झाल्याची माहिती देणारे दोघे त्यांच्या मागून पुन्हा आले व त्यांनी तुमचे पैसे मागे पडले आहे, असे चन्ने यांना सांगितले. त्यांनी मागे वळून बघितले असता तितक्यातच दोघांनी चन्ने यांच्या दुचाकीला लावलेली पैशाची बॅग घेऊन धूम ठोकली. श्री. चन्ने यांची दुचाकी पंक्चर असल्याने ते त्यांचा पाठलाग करू शकले नाही. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या