Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNilesh Chavhan Arrested: वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या;...

Nilesh Chavhan Arrested: वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या; नेपाळमधून केले अटक

पुणे | Pune
वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाणच्या मागावार तब्बल सहा पथक होती , अखेर निलेशला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. १० दिवसांनंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा अटक होण्याआधीच फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. या पथकांकडून विविध ठिकाणी तपास केला जात होता.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच वैष्णवीचे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला धमकावल्याचा आणि त्यांच्यावर बंदूक रोखल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता, त्याने नेपाळ गाठले होते. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यातून नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

YouTube video player

निलेशवर नेमके आरोप काय?
वैष्णवीचे बाळ ताब्यात ठेऊन ते परत देण्याच्या वेळी निलेश चव्हाण याने कस्पटे कुटूंबियांना पिस्तूलाचा धाक दाखवला होता. निलेश चव्हाण हा शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मित्र आहे. निलेश चव्हाणवरही बायकोच्या छळाचा आरोप आहे. त्याच्या पत्नीनेही त्याच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार जून २०२२ मध्ये केली होती. हिंजवडी आणि तळेगाव पोलिस ठाण्यात ही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. असे असताना ही त्याला नोव्हेंबर २०२२ मध्ये पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिला.हा परवाना देताना त्यावर सही अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...