Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVaishnavi Hagawane Case: कस्पटे कुटूंबियांकडून पूनम सुपेकरांनी रुखवतासाठी दीड लाख रुपये वसुल...

Vaishnavi Hagawane Case: कस्पटे कुटूंबियांकडून पूनम सुपेकरांनी रुखवतासाठी दीड लाख रुपये वसुल केले; अंजली दमानियांनी दिला पुरावा

पुणे | Pune
राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने सासरच्या जाचाला कंटाळून १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक हगवणे याचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप आहे. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी हगवणे कुटुंबाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर आता आणखी एक आरोप करण्यात येत आहे. वैष्णवीच्या लग्नाचे रुखवत हा जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीने तयार केला होता आणि त्यासाठी कस्पटे कुटुंबीयांकडून त्यांनी १ लाख ५० हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत माहिती समोर आणली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्वीट करताना दावा केला की, वैष्णवीच्या वडिलांकडून एक लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले गेले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील, असे वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणेंना सांगून १ लाखाचा चेक आणि ५० हजारांची रोख रक्कम हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेच्यांकडून वसूल केली. दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का? असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पूनम सुपेकर यांचीही वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी होणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisement -

जालिंदर सुपेकरांना गृहखात्याचा दणका
वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणी शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांची उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली आहे. त्या आधी जालिंदर सुपेकर हे विशेष पोलिस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची पदावनती उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आल्याच गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले. वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणेला बनावट कागदपत्रांच्या आधारे बंदुकीचा परवाना पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकरांमुळे मिळाला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Pune Bhor Crime News : नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार; CM फडणवीसांची पहिली...

0
मुंबई | Mumbai पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर तालुक्याच्या (Bhor Taluka) नरसापूर परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Rape) करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder)...