Sunday, March 30, 2025
Homeनाशिककंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

घोटी । जाकीर शेख Ghoti

- Advertisement -

नाशिक मुंबई महामार्गावरील वैतरणा फाट्याजवळ भरधाव कंटेनरने मोटरसायकलला धडक दिल्याने या धडकेत कंटेनर मोटरसायकल स्वाराच्या डोक्यावरून गेल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात इगतपुरी शहरातील योगेश मदन परदेशी, वय २५ वर्ष, राहणार खालची या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या बाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अपघात झाला त्या ठिकाणी पुलाचे काम चालू असून जागीच वळण आणि उतार असून कोणताही दिशा दर्शक फलकही नसुन मोठ्या प्रमाणात अंधार आहे. या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. या पुलाच्या कामामुळे आत्तापर्यंत या परिसरात शेकडो अपघात झाले असून शेकडो नागरिकांचा बळी गेला असुन कितीतरी कायमचे जायबंदी झाले आहेत.

सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची गटार नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे असून पावसाचे पाणी व मोठया प्रमाणावर चिखल होत आहे. या घटनेत कंटेनर चालकाला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...