अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर (Alcohol Liquor dens) नगर तालुका पोलिसांनी छापा (Nagar Taluka Police Raid) टाकला. या कारवाईत गावठी दारू (Gavathi Alcohol), कच्चे रसायन असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त (Police seized) केला आहे. नगर तालुक्यातील वाळकी (Valaki) शिवारात ही कारवाई केली. पोलिसांनी (Police) दिलेल्या फिर्यादीवरून भट्टी चालक संतोष दिलीप पवार (रा. धोंडेवाडी, वाळकी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाळकी (Valaki) येथील धोंडेवाडी तलावाच्या भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू बनवून विक्री केली जाते, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप (Assistant Inspector of Police Rajendra Sanap) यांना मिळाली होती. त्यांनी दिलेल्या सूचनेवरून नगर तालुका पोलिसांच्या पथकाने धोंडेवाडी येथील तलावाजवळ सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा (Raid) टाकला. ही कारवाई पोलीस हवालदार गणेश लबडे, महिला पोलीस हवालदार अमिना शेख, पोलीस हवालदार काळे, पोलीस नाईक बी. बी. कदम व योगेश ठाणगे यांनी केली.