राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
सोमवार दिनांक 17 जुलै रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 13 हजार 341 कांदा गोण्यांची आवक झाली.
- Advertisement -
एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 800 रुपये, दोन नंबरचा कांदा 805 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 800 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 700 रुपये ते 1 हजार 100 रुपये भाव मिळाला.
अपवादात्मक 21 कांदा गोण्यांना 2 हजार 200 रुपये, 72 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये, 107 कांदा गोण्यांना 2 हजार रुपये तर 78 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये भाव मिळाला.