राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
- Advertisement -
गुरूवार दिनांक 03 नोव्हेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 17 हजार 842 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 2 हजार 705 ते 3 हजार 500 रूपये दोन नंबरचा कांदा (Onion) 2 हजार 5 ते 2 हजार 700 रूपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 300 ते 2 हजार रूपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 800 ते 2 हजार 400 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 47 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 800 रूपये तर 36 कांदा गोण्यांना 3 हजार 700 रूपये तर 38 कांदा गोण्यांना 3 हजार 600 रूपये भाव मिळाला.
भुसार मालात बाजरी (कॅटल) 1 हजार 500 ते 1 हजार 800 रूपये, गहू 2 हजार 400 ते 2 हजार 900 रूपये, सोयाबीन (Soybeans) 4 हजार 400 ते 5 हजार 126 रूपये याप्रमाणे भाव मिळाले.