Wednesday, January 7, 2026
Homeनगरवांबोरीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

वांबोरीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गुरूवार दिनांक 16 जानेवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 4 हजार 591 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा 2 हजार 205 रुपये ते 2 हजार 800 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 505 रुपये ते 2 हजार 200 रुपयेे तर तीन नंबरचा कांदा (Onion) 200 रुपये ते 1 हजार 500 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 1000 रुपये ते 1 हजार 700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

अपवादात्मक 53 कांदा गोण्यांना 3 हजार 200 रुपये, 5 कांदा गोण्यांना 3 हजार 100 रुपये, 93 कांदा गोण्यांना 3000 रुपये तर 25 कांदा गोण्यांना 2 हजार 900 रुपयेभाव मिळाला. भुसार मालात ज्वारी 2 हजार 376 रुपये, गहु 2 हजार 600 रुपये ते 2 हजार 852 रुपये, तुर 6 हजार 700 रुपये ते 6 हजार 900 रुपये, मका 1 हजार 900 रुपये तर सोयाबीन 3 हजार 951 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

YouTube video player

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...