Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमRahuri : वांबोरीत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी

Rahuri : वांबोरीत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी

लाखोंचा ऐवज लंपास, सहा जणांची टोळी सीसीटीव्हीत कैद

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत ज्वेलर्सचे दुकान, जैन मंदिर व एका बंद घरावर डल्ला मारून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे अशी घटना महिन्याभराच्या आत दुसर्‍यांदा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सहा जणांची टोळी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

- Advertisement -

शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी प्रथम जैन मंदिराच्या दरवाज्याचा पितळी कोंडा कटरने तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील सुमारे 150 किलो वजनाची दानपेटी बाहेर नेऊन फोडत त्यातील अंदाजे 80 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य बाजारपेठेतील नीरज संतोष शर्मा यांच्या ‘शर्मा ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर व कुलपे तोडून दुकानातील सुमारे एक किलो चांदीचे दागिने तसेच सोन्याच्या मुलाम्याचे नेकलेस व अंगठ्या असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यानंतर अनुज पंचारीया यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी उचकापाचक केली, मात्र तेथे काहीही हाती न लागल्याचे समजते.

वांबोरी हे लोकसंख्येने मोठे व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठ व बंद घरांवर वारंवार चोरीच्या घटना घडत असून, गुन्हे दाखल होऊनही तपासाला गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाजारपेठच सुरक्षित नसेल तर वाड्या-वस्त्यांची काय अवस्था? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांच्यासह श्वान पथक, ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी पाहणी करून माहिती गोळा केली. तसेच हवालदार अशोक झिने, सतीश कुर्‍हाडे, पो.ना. संतोष निकम आदींनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपी जेरबंद केले जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parisahd Election : शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगचा उत्साह पडला महागात; भाजप...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांना (BJP Corporators) सहलीसाठी रवाना करण्यात येत असताना नगरसेवकांना घेऊन जाणारी लक्झरी...