Friday, April 25, 2025
HomeराजकीयPrakash Ambedkar : …तर आम्ही त्यांची साथ देऊ; निकालाआधीच आंबेडकरांनी भूमिका केली...

Prakash Ambedkar : …तर आम्ही त्यांची साथ देऊ; निकालाआधीच आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट

मुंबई । Mumbai

बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता २४ तासापेक्षा कमी कालावधी उरला आहे. बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मागच्या ३० वर्षातील सर्वाधिक मतदान झालं आहे. जवळपास ६६ टक्के मतदान झालं आहे.

- Advertisement -

हे वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? या बद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, युती किंवा आघाडीला अपक्ष किंवा लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर एक पोस्ट करत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, “जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ. आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू!”.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपावर तोडगा निघू न शकल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीत स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अन्य उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला यश येते की त्यांच्या पदरी पुन्हा अपयश येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...